आमचं मुख्य ध्येय आहे – विद्यार्थ्यांच्या मनात लहान वयातच "मी अधिकारी होणारच" ही ठाम भावना रुजवणं. ही भावना त्यांच्या फक्त विचारांपुरती मर्यादित न राहता, त्यांच्या subconscious mind मध्ये खोलवर जावी, अशी आमची प्रक्रिया आहे. आम्ही आठवी ते बारावी या वयोगटातील मुलांना त्यांच्या स्वप्नांची दिशा देतो, त्यासाठी योग्य सवयी, मानसिकता आणि आत्मविश्वास विकसित करतो. Visualization आणि Affirmation च्या माध्यमातून दररोज अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांच्या मनात सजीव केलं जातं. या प्रक्रियेमुळे अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांचा नैसर्गिक विकास होतो.
जसा मुलगा सुरुवातीला लक्षपूर्वक सायकल शिकतो आणि नंतर ती आपोआप चालवायला लागतो, तसंच अधिकारी बनण्याची तयारीही जेव्हा subconscious mind मध्ये जाते, तेव्हा ती कृती आपोआप घडू लागते. आम्ही याच मानसिकतेला प्रशिक्षण देतो. आमचा ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, अध्ययन पद्धती, वेळेचं व्यवस्थापन आणि यशस्वी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन करतो. अभ्यास म्हणजे एक बोझा नसून, ते आपलं ध्येय साध्य करण्याचं प्रभावी साधन आहे – हे आम्ही मुलांच्या मनात खोलवर बिंबवतो.
याच प्रवासात आम्ही पालकांनाही सहभागी करून घेतो, जेणेकरून घरचं वातावरणही प्रेरणादायी आणि सकारात्मक राहील. आमचं मिशन आहे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं, स्वप्न मोठं बघायला शिकवणं आणि त्या स्वप्नासाठी जिद्दीने लढायला तयार करणं. कारण आमचं ठाम मत आहे – जर स्वप्न subconscious mind मध्ये गेलं, तर ते फक्त स्वप्न राहात नाही... ते वास्तव होतं!
1) प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच भावना निर्माण करणे – “मी अधिकारी होणारच.” ही भावना त्यांच्या subconscious mind मध्ये खोलवर रूजवणे.
2) लहान वयातच अधिकारी होण्याचं स्वप्न दाखवणे. त्या स्वप्नासाठी योग्य दिशा देणे.
3) दररोज छोटे छोटे पण ठोस टप्पे शिकवणे.
4) दररोज visualization करून मनात यशाचं चित्र रंगवायला शिकवणे.
5) दररोज सकारात्मक affirmation वापरायला लावणे.
6) “माझं ध्येय मी गाठणारच” ही जिद्द तयार करणे.
7) शाळेच्या अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षा लक्षात घेऊन मार्गदर्शन करणे.
8) आठवी ते बारावी वर्गातील मुलांना योग्य वेळेपासूनच तयार करणे.
9) अभ्यासातील consistency वाढवणे.
10) मोबाईल, टीव्हीपासून मुलांचं लक्ष वळवून ध्येयाकडे नेणे.
11) study plan, time management शिकवणे.
12) discipline, routine याची सवय लावणे.
13) “दिवस जाईल पण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे” ही वृत्ती तयार करणे.
14) subconscious mind च्या वापराने स्वयंचलित यशाचा मार्ग उघडणे.
15) कल्पना, भावना आणि कृती यांचं एकत्रिकरण करणे.
16) मुलांमध्ये आत्मविश्वास भरणे.
17) अपयश आलं तरी थांबायचं नाही हे शिकवणे.
18) ध्येय किती मोठं आहे याची जाणीव मुलांना करून देणे.
19) स्वप्नं बघणं आणि ती पूर्ण करण्याची प्रक्रिया समजावणे.
20) विविध अधिकारी पदांबद्दल माहिती देणे.
21) त्यांच्या मनात समाजासाठी काही तरी करण्याची भावना जागवणे.
22) अभ्यास म्हणजे बोजा नाही, तो एक साधन आहे हे पटवून देणे.
23) अभ्यासाचं कारण आणि उद्दिष्ट स्पष्ट करणे.
24) ज्या पद्धतीने शरीराला अन्न लागतं, तसंच मनाला प्रेरणा लागते – हे समजावणे.
25) मुलांना एक “मिशन” देणे आणि त्यासाठी जबाबदार बनवणे.
26) पालकांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे.
27) ऑनलाईन कोर्सद्वारे हे शिक्षण पोचवणे.
28) शेवटी एक जबरदस्त अधिकारी घडवणे – मनाने, बुद्धीने आणि कृतीने!